शिवसेनेला टोला लगावताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘ मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यानंतर दादरा व नगर हवेलीमध्ये सहानुभूतीची लाट होती. त्यामध्येच त्यांच्या पत्नी कलाबेन डेलकर या निवडून आल्या. शिवसेनेने आता उर्वरित निवडणुका देखील त्यांच्या चिन्हावर लढवाव्यात, असा टोला लगावतानाच, एका विजयाने उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार हा दावा हास्यास्पद आहे. सर्वसामान्यांना हे आवडेल की नाही ते पाहा, अशी खोचक टिप्पणी पाटील यांनी केली आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘एसटी कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढू नका, अन्यथा…’; राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
शिवसेनेवर टीकास्त्र सोडताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरही भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात तुम्ही दुसऱ्याचे उमेदवार घेऊन निवडणूक लढविली, अशी टिप्पणी भाजपवर केली होती. पण मग तुम्ही काय केले? दादरा-नगर हवेलीमधील उमेदवार तुमचे होते का? आम्ही जर दुसरे उमेदवार घेतले तर आमच्यावर टिका केली जाते. पण, तुम्हीही तेच करत आहात त्याचे काय? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे.
क्लिक करा आणि वाचा- दिवाळी आज, पण पाडवा १ जानेवारीला होणार’; किरीट सोमय्यांनी केली ‘ही’ घोषणा
कलाबेन डेलकर यांच्या विजयावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, मोहन डेलकर यांनी आत्महत्या केल्यामुळे लोकांमध्ये सहानुभूतीची भावना होती. या सहानुभूतीच्या लाटेमुळेच डेलकर निवडून आल्या. शिवसेनेने आता इतर निवडणुकाही त्यांच्याच चिन्हावर लढवाव्यात, असे सांगतानाच एका विजयाने उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार हा दावा करणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- सॅम डिसूझाला धक्का; हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज नाकारला, ‘हे’ कारण