शेअर बाजारात तेजीची आतषबाजी ; मुहूर्ताला सेन्सेक्स ३५० अंकांनी वधारला


हायलाइट्स:

  • मुंबई शेअर बाजारात मुहूर्ताचे ट्रेडिंग सुरु झाले.
  • या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३५० अंकांनी वधारला.
  • सेन्सेक्स आणि निफ्टीने संवत्सर २०७८ या वर्षाची दणक्यात सुरुवात केली.

मुंबई : आज लक्ष्मीपुजनानंतर मुंबई शेअर बाजारात मुहूर्ताचे ट्रेडिंग सुरु झाले. या सत्रात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३५० अंकांनी वधारला. सेन्सेक्स आणि निफ्टीने नव्या वर्षाची सुरुवात दणक्यात केल्याने गुंतवणूकदार आणि शेअर दलालांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

इथं मिळेल बचतीवर सर्वाधिक परतावा ; देशातील या लघु वित्त बँंका देतात इतक व्याज
सध्या सेन्सेक्स ३५९ अंकांनी वधारला असून तो ६०१११ अंकावर गेला आहे. निफ्टी १०१ अंकांनी वधारून १७९३१ अंकावर व्यवहार करत आहे. आजच्या विशेष सत्रात सेन्सेक्समधील सर्वच ३० शेअर वधारले आहे. त्याच बरोबर निफ्टीमधील सर्व क्षेत्रीय निर्देशांकात वाढ झाली आहे.

आज एसबीआय, महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, कोटक बँक, आयटीसी, बजाज ऑटो, पॉवरग्रीड, एनटीपीसी, टायटन, एल अँड टी , एचडीएफसी बँक, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक या शेअरमध्ये वाढ झाली आहे. त्याशिवाय आयशर मोटोर, एस्कॉर्ट, महिंद्रा लॉजिस्टिक या शेअरमध्ये वाढ झाली आहे.

स्मार्ट गुंतवणूक; मुहूर्त ट्रेडिंगमध्ये काय करावे अन् काय करू नये, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
तत्पूर्वी आजच्या लक्ष्मीपुजन सोहळ्याला मुंबई शेअर बाजारात अभिनेत्री भाग्यश्री प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. शेअर बाजाराचे मुख्य सत्र संध्याकाळी ६.१५ वाजता भाग्यश्री हिच्या हस्ते घंटानाद करुन सुरु करण्यात आले. यावेळी मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक आशिष कुमार चौहान आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

संवत्सर २०७७ ला घसरणीसह निरोप देण्यात आला. बाजार बंद होताना सेन्सेक्स २५७ अंकांनी कोसळला आणि ५९७७१ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६० अंकांनी घसरला आणि १७८२९ अंकावर स्थिरावला. मात्र आज मंदीचे मळभ दूर सारत गुंतवणूकादारांनी खरेदीला भर दिला.

आजच्या मुहूर्ताच्या सौद्यांमध्ये गुंतवणूकदारांनी चांगला परतावा देणारे शेअर निवडायला हवेत जे बाजाराच्या प्रतिकूल परिस्थितीत तग राहून राहतील. संवत्सर २०७८ हे बँकिंगचे वर्ष असेल असे संकेत आहेत. काही बँकांच्या कर्ज वितरणात वाढ झाली आहे. अर्थव्यवस्था करोना संकटातून सावरली आहे. त्यामुळे या क्षेत्राचा विचार करायला हवा, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकर डॉ. व्ही. के विजयकुमार यांनी व्यक्त केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: