कॅच पकडला नाही म्हणून स्वत:च्या संघातील खेळाडूला घातल्या शिव्या, पाहा व्हिडिओ


दुबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२१ मधील ग्रुपमधील लढतीत ऑस्ट्रेलियाने बांगलादेशवर सहज विजय साकारला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर बांगलादेशचा डाव फक्त ७५ धावात संपुष्टात आला. बांगलादेशकडून फक्त तिघांना दुहेरी धावसंख्या करता आली. ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झप्पाने पाच विकेट घेतल्या.

वाचा- हिटमॅन रोहितचा नाद करायचा नाय; वर्ल्डकप इतिहासातील सर्वात मोठा विक्रम केला

विजयासाठी ७४ धावांचे किरकोळ आव्हान ऑस्ट्रेलियाने ६.२ षटकात २ विकेटच्या बदल्यात पार केले. टी-२० वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक चेंडू राखून मिळवलेला हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विजय ठरलाय. ऑस्ट्रेलियाने ८२ चेंडू शिल्लक ठेवून विजय मिळवला. याआधी श्रीलंकेने २०१४ साली नेदरलँडवर ९० चेंडू राखून विजय मिळवला होता.

वाचा- Rohit Sharma Six: हिटमॅन रोहितचा तडाखा; विराट कोहलीला जागेवरून उठवले, Video

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशची गोलंदाजी सुरू असताना एक घटना घडली ज्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे. आयसीसीने याचा व्हिडियो शेअर केलाय. ऑस्ट्रेलियाची फलंदाजी सुरू असताना तिसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर कर्णधार अॅरॉन फिंचने हवेत शॉट खेळला. सीमा रेषेवर उभा असलेल्या खेळाडूला कॅच घेण्याची संधी होती. पण त्याला फिल्डरला कॅच घेता आला नाही. यावर गोलंदाज संतापला आणि रागाच्या भरात स्वत:च्या संघातील खेळाडूला शिव्या घातल्या.

वाचा- भारताकडून मिळालेल्या पराभवाची भरपाई न्यूझीलंडविरुद्ध करणार; राशिद खानने केलं मोठं वक्तव्य

आयसीसीने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना आयसीसीने I hope the fielder can’t read lips…असे म्हटले आहे. पाहा व्हिडिओ…


ऑस्ट्रेलियाकडून फिंचने सर्वाधिक धावा केल्या. या विजयासह त्यांनी ग्रुप ए मध्ये ६ गुणांसह दुसरे स्थान मिळवले आहे. ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिकेचे देखील ६ गुण आहेत. पण नेट रनरेटच्या जोरावर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. या दोन्ही संघांच्या प्रत्येकी एक लढती शिल्लक आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: