थोड्याच वेळात मुहूर्त ट्रेडिंग; या गोष्टी ठरवतील आजची शेअर बाजाराची दिशा


हायलाइट्स:

  • सर्वसाधारणपणे गुंतणूकदार मुहूर्ताला खरेदी करुन नव्या वर्षाची सुरुवात करतात.
  • बुधवारी शेअर बाजारात अखेरच्या सत्रात पडझड झाली होती.
  • आज मुहूर्त ट्रेडिंगचे मुख्य सत्र १८:१५ ते १९:१५ दरम्यान होईल.

मुंबई : आज शेअर बाजारात लक्ष्मीपुजन आणि मुहूर्तचे सौदे होणार आहेत. मुहूर्त ट्रेडिंग प्री-सेशन १८:०० ते १८:०८ दरम्यान होईल, तर मुख्य सत्र १८:१५ ते १९:१५ दरम्यान शेड्यूल केले जाईल. सर्वसाधारणपणे गुंतणूकदार मुहूर्ताला खरेदी करुन नव्या वर्षाची सुरुवात करतात. बुधवारी शेअर बाजारात अखेरच्या सत्रात पडझड झाली होती. बाजार बंद होताना सेन्सेक्स २५७ अंकांनी कोसळला आणि ५९७७१ अंकावर स्थिरावला होता.

केंद्र सरकारचे दिवाळी गिफ्ट ! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, उत्पादन शुल्कात मोठी कपात
आजच्या मुहूर्ताच्या सौद्यांमध्ये गुंतवणूकदारांनी चांगला परतावा देणारे शेअर निवडायला हवेत जे बाजाराच्या प्रतिकूल परिस्थितीत तग राहून राहतील. संवत्सर २०७८ हे बँकिंगचे वर्ष असेल असे संकेत आहेत. काही बँकांच्या कर्ज वितरणात वाढ झाली आहे. अर्थव्यवस्था करोना संकटातून सावरली आहे. त्यामुळे या क्षेत्राचा विचार करायला हवा, असे मत जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकर डॉ. व्ही. के विजयकुमार यांनी व्यक्त केले.

स्मार्ट गुंतवणूक; मुहूर्त ट्रेडिंगमध्ये काय करावे अन् काय करू नये, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
एलकेपी सिक्युरिटीजचे रोहित सिंगरे यांनी सांगितले निफ्टी १७००० ते १८००० च्या दरम्यान आहे. जो पर्यंत ही पातळी तोडत नाही, तोपर्यंत निर्देशांकाची पुढील दिशा कळणार नाही. १७७५० ते १७७०० च्या पातळीवर नफावसुली होऊ शकते, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

खुशखबर! सणासुदीत सोन्याचा भाव गडगडला, जाणून घ्या आज कितीने स्वस्त झालं सोनं
दरम्यान, अमेरिकन बाजारात काल घसरण झाली आहे. त्याचबरोबर जागतिक कमॉडिटी बाजारात कच्च्या तेलाचा भाव कमी झाला आहे. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केल्याने नजीकच्या काळात महागाईचा पारा उतरेल, अशी शक्यता आहे. त्यामुळे आजच्या सत्रात गुणतवणूकदार खरेदीला प्राधान्य देण्याची शक्यता आहे.

इथं मिळेल बचतीवर सर्वाधिक परतावा ; देशातील या लघु वित्त बँंका देतात इतक व्याज
संवत्सर २०७७ ला घसरणीसह निरोप देण्यात आला. बाजार बंद होताना सेन्सेक्स २५७ अंकांनी कोसळला आणि ५९७७१ अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ६० अंकांनी घसरला आणि १७८२९ अंकावर स्थिरावला.

या शेअरसाठी विश्लेषकांनी दिलाय खरेदीचा सल्ला

– इंडियन एनर्जी एक्सचेंज – टार्गेट ८९० रुपये

– कंटेनर काॅर्पोरेशन आॅफ इंडिया – टार्गेट ८३० रुपये

– हनीवेल आॅटोमेशन – टार्गेट ४९८४० रुपये

– व्हर्लपूल इंडिया – टार्गेट २५९० रुपये

-क्लिन सायन्स टेक – टार्गेट २३५० रुपये

– केपीआर मिल्स – टार्गेट ५५० रुपयेSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: