कर्णधार पदासाठी राहुल द्रविडची पहिली पसंती ‘या’ खेळाडूला; लवकरच सूत्रे घेणार हाती


नवी दिल्ली : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१नंतर भारतीय क्रिकेट संघात अनेक गोष्टी बदलणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज राहुल द्रविड हा टीम इंडियाचा नवा कोच असणार आहे. सध्याचा क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने यापूर्वीच टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचे जाहीर केले होते. टी-२० विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठू शकला नाही, तर विराटला ५० षटकांच्या क्रिकेट प्रकारातही भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणार नाही.

वाचा- Rohit Sharma Six: हिटमॅन रोहितचा तडाखा; विराट कोहलीला जागेवरून उठवले, Video

टी-२० विश्वचषकानंतर संघात अनेक बदल होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने कर्णधारपदासाठी रोहित शर्माला पहिली पसंती दिली आहे. जेव्हा द्रविडला विचारण्यात आले की, कर्णधार म्हणून त्याची पहिली पसंती कोण आहे, तेव्हा त्याने रोहित शर्माचे नाव घेतले. त्यानंतर त्याने के.एल.राहुलचेही नाव घेतले. यासंबंधीचे वृत्त इंग्रजी वृत्तसंस्था इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

वाचा- भारताकडून मिळालेल्या पराभवाची भरपाई न्यूझीलंडविरुद्ध करणार; राशिद खानने केलं मोठं वक्तव्य

दरम्यान, राहुल द्रविडची भारतीय पुरुष संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान राहुल द्रविडची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याची बातमी आली होती. राहुल द्रविड या महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टी-२० मालिकेपासून जबाबदारी स्वीकारणार आहे.

वाचा- हिटमॅन रोहितचा नाद करायचा नाय; वर्ल्डकप इतिहासातील सर्वात मोठा विक्रम केला

प्रशिक्षक नियुक्तीनंतर आता कर्णधारपदाबाबतही अटकळ बांधली जात आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीचा हा शेवटचा टी-२० विश्वचषक आहे. त्याचवेळी त्याच्याकडून एकदिवसीय क्रिकेटचे कर्णधारपदही काढून घेतले जाऊ शकते, अशा बातम्या येत आहेत. अशा स्थितीत टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कोण असेल? याविषयी अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत.

वाचा- धक्कादायक वक्तव्य; रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाल्यास होणार मोठे नुकसान

रोहित शर्माने व्यक्त केला आनंद
दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्माला राहुल द्रविडच्या प्रशिक्षकपदी नियुक्तीबाबत विचारण्यात आले. तेव्हा रोहित शर्मानेही द्रविडची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: