Thief in Dream City Project: डी. एस. कुलकर्णी यांच्या ड्रीम सिटी प्रोजेक्टमध्ये चोर शिरला, आणि…


म. टा. प्रतिनिधी, पुणे

डी. एस. कुलकर्णी (DS Kulkarni) यांच्या फुरसुंगी येथील ड्रीम सिटी प्रोजेक्टमध्ये स्टिलची चोरी करण्यासाठी आलेल्या चोरांना प्रतिकार करणाऱ्या सुरक्षारक्षकावर कोयत्याने वार केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. ही घटना दोन ऑक्टोबरला रात्री साडेआठच्या सुमारास हडपसरमधील कवटीपाट परिसरातील ड्रीम सिटी इमारतीत घडली. (thief in dream city project of ds kulkarni at fursungi)

क्लिक करा आणि वाचा- दिवाळी आज, पण पाडवा १ जानेवारीला होणार’; किरीट सोमय्यांनी केली ‘ही’ घोषणा

या प्रकरणी २८ वर्षीय सुरक्षारक्षकाने दिलेल्या तक्रारीवरून तीन चोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजा रवी पवार (वय २२, रा. गुजरवस्ती, कवडीपाट), संकेत गायकवाड (वय २२, रा. गुजरवस्ती, कवडीपाट) आणि सुमित साळवे (वय २२, रा. गोसावी वस्ती, कवडीपाट) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यांना अटक करण्यात आली आहे.

क्लिक करा आणि वाचा- सॅम डिसूझाला धक्का; हायकोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज नाकारला, ‘हे’ कारण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डीएसके ग्रुपचा फुरसुंगी येथील ड्रिम सिटी हा प्रोजेक्ट आहे. या ठिकाणी आतापर्यंत अनेकदा चोरीचे प्रयत्न झाले असून, हडपसर पोलिसात गुन्हे दाखल झालेले आहेत. या ठिकाणी दोन नोव्हेंबरला रात्री साडेआठच्या सुमारास तिघा आरोपींनी बिल्डिंगमध्ये प्रवेश करून तेथील स्टील चोरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चोरांनी तेथे उपस्थित सुपरवायझर शरद कोंडूसकर यांना रॉडचा धाक दाखविला. तर, सुरक्षारक्षक निवृत्ती मोरे यांच्या मानेवर कोयता ठेवला होता. त्यावेळी मोरे यांनी चोरांचा प्रतिकार केला. त्यामुळे चोरट्यांनी मोरे यांच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले. या प्रकरणी सहायक निरीक्षक सचिन थोरात तपास करीत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- आता तुम्हीच घरबसल्या मोजू शकता गोंगाट!; नीरीचे ‘नॉईज ट्रॅकर अ‍ॅप’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: