म. टा. खास प्रतिनिधी, मुंबईः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर लवकरच नव्या घरात प्रवेश करणार असल्याचे समजते. दादर येथील ‘कृष्णकुंज’शेजारीच नवी पाच मजली इमारत बांधण्यात आली आहे. यामध्ये राज कुटुंबासह गृहप्रवेश करणार असल्याचे कळते. यासाठी जय्यत तयारी सध्या सुरू असून, या नव्या इमारतीला ते काय नाव देतात, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.