Pravin Darekar: प्रवीण दरेकर यांनी घेतली अनिल परब यांची भेट; आभार मानले आणि…


हायलाइट्स:

  • एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे.
  • दरेकर यांची परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे मागणी.
  • एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर केली चर्चा.

मुंबई:एसटी महामंडाळाचे राज्य सरकारमध्ये तातडीने विलीनीकरण करून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे केली. ( Pravin Darekar Anil Parab Meeting Update )

वाचा:मोठी बातमी: अनिल देशमुखांविरुद्ध परमबीर यांच्याकडे पुरावेच नाहीत!

विरोधी पक्षनेते दरेकर यांनी आज परिवहन मंत्री परब यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घतेली. यावेळी एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने उपस्थित होते. यावेळी दरेकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले व मंत्री परब यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सविस्तर माहिती दिली. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा विषय महाराष्ट्रभर सुरू आहे. विविध कर्मचारी यूनियन, कृती समित्या आणि काही ठिकाणी कर्मचारी न्यायासाठी आंदोलन करत आहेत. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांना सांगून व आपली प्रतिष्ठा पणाला लावून परिवहनमंत्री परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर केले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. हा पगाराचा दिलासा कायम स्वरूपी राहावा, अशी विनंतीही दरेकर यांनी परब यांना केली. दोन-तीन महिन्यांनी पुन्हा कर्मचाऱ्यांचे पगार रखडल्याची परिस्थिती निर्माण होऊ नये, अशी विनंतीही दरेकर यांनी केली. त्यामुळे परिवहन खात्याने एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने प्रस्ताव तयार करून तो राज्य सरकारकडे पाठविण्याची मागणीही दरेकर यांनी यावेळी केली.

वाचा:आर्यन खान ‘त्या’ अटींचे पालन करतोय का?; महत्त्वाची माहिती आली समोर

विलीनीकरणामुळे सरकारच्या तिजोरीवर आर्थिक बोजा येईल याचे मला भान आहे. तथापि राज्य सरकार ही प्रॉफिट मेकिंग संस्था नाही. आपण सेवा देणारी संस्था आहोत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांकडे असणारे त्यांचे वजन परब यांनी वापरावे. विरोधी पक्ष म्हणून जे सहकार्य लागेल ते आपल्याला व राज्य सरकारला निश्चितपणे करू, असा विश्वासही दरेकर यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांच्याशीही याविषयी चर्चा केली आहे. राज्य सरकारने या विषयावर विरोधकांना चर्चेसाठी बोलावले तर आम्ही निश्चितपणे सरकारला सहकार्य करू, असे आश्वासनही दरेकर यांनी परब यांना दिले.

वाचा: केंद्र सरकारचे दिवाळी गिफ्ट ! पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, उत्पादन शुल्कात मोठी कपात

सध्या एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या काळात त्यांच्यावर करण्यात येणारी प्रशासकीय कार्यवाही थांबविण्यात यावी. त्याचप्रमाणे त्यांच्यावर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या मान्य झाल्या आहेत त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हावी. प्रामुख्याने डीएमध्ये झालेली वाढ ही लवकर द्यावी व वेतन आणि इतर भत्ते वेळेवर देण्यात यावेत, अशी मागणीही दरेकर यांनी परिवहनमंत्री परब यांच्याकडे केली आहे. एसटी कर्मचारी अत्यंत कठीण परिस्थितीत सेवा देत आहेत. आपल्या आरोग्याची व तब्येतीची पर्वा न करता प्रामाणिकपणे दिवसरात्र सेवा देत आहेत. त्याचा सहानुभूतीने विचार करून सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षाही दरेकर यांनी व्यक्त केली.

वाचा: साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी; शिर्डीत यंदा दीपोत्सव होणार, पण…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: