Ajit Pawar: आता करानामुक्तीकडे जायचंय!; दिवाळीच्या शुभेच्छा देताना अजित पवार म्हणाले…


हायलाइट्स:

  • यंदाची दिवाळी कोरोनामुक्तीकडे नेणारी ठरो.
  • नियम पाळून आरोग्यदायी दिवाळी साजरी करा.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शुभेच्छा संदेश.

मुंबई: ‘यंदाची दिवाळी सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, समाधान, आनंद, उत्तम आरोग्य घेऊन येवो. दिवाळीतील दिव्यांच्या रोषणाईने अंध:कार दूर होऊन सर्वांचे जीवन प्रकाशमय होवो. यंदाची दिवाळी राज्याला करोनामुक्तीकडे नेणारी ठरो’, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ( Ajit Pawar Diwali Greeting Updates )

वाचा:मोठी बातमी: अनिल देशमुखांविरुद्ध परमबीर यांच्याकडे पुरावेच नाहीत!

अजित पवार दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हणाले की, दिवाळी हा दिव्यांच्या रोषणाईचा, प्रकाशाचा, सर्वांना सोबत घेऊन आनंद साजरा करण्याचा सण. दिवाळीतील दिव्यांच्या प्रकाशानं आपल्या सर्वांच्या जीवनातील अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी परंपरांचा अंध:कार दूर होवो. राज्यातल्या प्रत्येक घरात धन-धान्य, सुख-शांती, उत्तम आरोग्याची समृद्धी येवो. दिवाळी साजरी करत असताना समाजातील गरीब, वंचित, दुर्बल बांधवांना आनंदात सहभागी करून घेण्याची परंपरा आपण यंदाही कायम ठेवूया.

वाचा: कलाबेन डेलकर यांचे मातोश्रीवर जंगी स्वागत; CM ठाकरेंच्या भेटीनंतर म्हणाल्या…

करोना व प्रदुषण प्रतिबंधक नियमांचं पालन करून आरोग्यदायी दिवाळी साजरी करूया, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. गेल्या दिवाळीत कोविडची स्थिती गंभीर होती. त्यामुळे अनेक निर्बंधही लादण्यात आले होते. त्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत निर्बंधांतून बऱ्यापैकी मुक्ती मिळालेली आहे. कोविडची साथही सध्या नियंत्रणात आहे. तोच धागा पकडत यंदाची दिवाळी राज्याला करोनामुक्तीकडे नेणारी ठरो, अशा भावना अजित पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.

वाचा:परमबीर सिंग बेल्जियममध्ये?; नितेश राणे यांचा आदित्य ठाकरेंवर थेट आरोपSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: