अफगाणिस्तान फक्त या एका गोष्टीच्या जोरावर भारताला देऊ शकतो धक्का, कोणती जाणून घ्या…


T20 World Cup 2021 : नवी दिल्ली : पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आज अफगाणिस्तानशी दोन हात करणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अफगाणिस्तानची गोलंदाजी अनेक संघांपेक्षा चांगली असल्यामुळे तुम्ही हा सामना हलक्यात घेऊ नका, असे त्याने म्हटले आहे. गंभीरच्या मते अफगाणिस्तानला हरवणे इतके सोपे नसेल.

टी-२० विश्वचषकात भारतीय संघाची कामगिरी आतापर्यंत अत्यंत खराब राहिली आहे. कारण पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात संघाला १० गडी राखून, तर दुसऱ्या सामन्यात ८ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. संघाचा कोणताही फलंदाज किंवा गोलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. या दोन पराभवानंतर भारतीय संघाच्या उपांत्य फेरी गाठण्याच्या आशाही जवळपास संपुष्टात आल्या आहेत.

भारतीय संघाला आता तिन्ही सामने जिंकायचे असून त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान अफगाणिस्तान संघाचे आहे. गौतम गंभीरनेही भारताला अफगाणिस्तान संघापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. गंभीर म्हणाला की, अफगाणिस्तानकडे श्रीलंका आणि बांगलादेशपेक्षा चांगले गोलंदाजी आक्रमण आहे.

अफगाणिस्तानची चांगली कामगिरी
अफगाणिस्तानबद्दल बोलायचे झाले, तर टी-२० विश्वचषकात आतापर्यंत त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे. या संघाने तीन सामने खेळले असून त्यापैकी दोन सामने जिंकले आहेत. त्यांनी स्कॉटलंड आणि नामिबियाचा सहज पराभव केला आणि पाकिस्तानविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अफगाणिस्तानकडे राशिद खान, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान यांसारखे प्रतिभावान फिरकीपटू आहेत आणि भारतीय संघाला त्यांच्यापासून सावधगिरी बाळगावी लागेल. पाकिस्तान संघाला अफगाणिस्तानने कडवी झुंज दिली आणि सध्या तो संघ उत्कृष्ट लयीत दिसत आहे. त्यामुळे ते कोणत्याही संघाला धक्का देऊ शकतात. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्ध खेळताना कोणत्याही संघाने गाफिल राहता कामा नये, कारण अफगाणिस्तान सध्याच्या घडीला उपांत्य फेरीच्या शर्यतीमधील दावेदार आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: