Uttarakhand: केदारनाथ पुरोहितांकडून मोदी दौऱ्याचा विरोध, मुख्यमंत्री धामींकडून मनधरणी


हायलाइट्स:

  • येत्या ५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड दौऱ्यावर
  • पुरोहित आणि पंडा समाजाकडून मोदींच्या दौऱ्याला विरोध
  • सात तास केदारनाथमध्ये राहूनही माजी मुख्यमंत्री रावतांना दर्शनाची संधी नाही

नवी दिल्ली : येत्या ५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केदारनाथ दौरा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, चक्क केदारनाथ धामातील पुरोहितांनीच पंतप्रधानांच्या या दौऱ्याचा जोरदार विरोध केला आहे. हे समोर आल्यानंतर पुरोहितांची मनधरणी करून त्यांना समजावण्यासाठी थेट मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी केदारनाथमध्ये दाखल झाले आहेत.

माजी मुख्यमंत्री रावत यांना विरोध

बुधवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी पंतप्रधानांच्या दौऱ्याचा विरोध करणाऱ्या पुरोहितांची समजूत घालण्यासाठी केदारनाथ धाममध्ये दाखल झाले. बंद खोलीत मुख्यमंत्र्यांनी बराच वेळ पुरोहितांना समजावण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळतेय.

दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत आणि कॅबिनेट मंत्री धन सिंह रावत यांच्यासहीत भाजप प्रदेशाध्यक्षांचा केदारनाथमध्ये जोरदार विरोध करण्यात आला. माजी मुख्यमंत्री रावत यांना पुरोहितांनी दर्शनाचीही संधी दिली नाही. तब्बल सात तास केदारनाथ धाममध्ये राहूनही रावत यांना दर्शन घेता आलं नाही. त्यानंतर पुरोहितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्याचाही विरोध करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर उत्तराखंड सरकार आणि मुख्यमंत्री धामी चिंतेत आहेत.

उत्तराखंडच्या आपल्या दौऱ्यात पंतप्रधान मोदी गुरु शंकराचार्य यांच्या समाधीचं लोकार्पणही करणार आहेत. मात्र, पुरोहित आणि पंडा समाजाचा विरोध पाहून धास्तावलेले मुख्यमंत्री धामी आज केदारनाथला पोहचले. यावेळी, त्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या तयारीचा विशेष आढावाही घेतला. सोबतच, पुरोहित समाजाचा रोष आणि विरोध कमी करण्याचा प्रयत्न केला. ‘आजची चर्चा यशस्वी ठरली. पुरोहित समाज पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उत्सुक आहे’, असं मीडियाशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

Narendra Modi: ऐन दिवाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तराखंड दौऱ्यावर
melt temple gold into bars : मंदिरांचे २००० किलोहून अधिक सोने वितळवण्यात येणार होते! हायकोर्टने टोचले कान…
का होतोय पंतप्रधानांच्या दौऱ्याला विरोध?

जानेवारी २०२० मध्ये त्रिवेंद्र सिंह रावत सरकारनं चार धाम देवस्थानम बोर्ड गठीत केलं होतं. यावेळी, चार धामसहीत तब्बल ५१ इतर मंदिरांचं नियंत्रण राज्य सरकारकडे आलं. उत्तराखंडात केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आणि ब्रदीनाथ असे चार धाम आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे आपल्या हातातले अधिकार काढून घेतल्याचं सांगत पुरोहित आणि पंडा सामाजाकडून भाजप सरकारचा जोरदार विरोध सुरू झाला.

या प्रश्नावर तोडगा म्हणून मुख्यमंत्री धामी यांनी एका समितीचं गठन करून अहवालाच्या आधारावर निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु, यासाठी निश्चित करण्यात आलेल्या तारीख – ३० ऑक्टोबर – उलटून गेल्यानंतरही यासंबंधी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे पुरोहित समाजानं पुन्हा एकदा आपला विरोध दर्शवण्यास सुरूवात केलीय.

bypoll results 2021 : ‘जनतेचा मूड बदलतोय…..’, पोटनिवडणुकीत भाजपच्या पराभवावर बोलली काँग्रेस
shiv sena wins dadra and nagar haveli bypoll : भाजपचा धुव्वा! दादरा आणि नगर हवेलीत शिवसेनेचा भगवा फडकला, कलाबेन डेलकर विजयी
Assam: राजीनामा देत भाजपमध्ये दाखल होणाऱ्या उमेदवाराकडून काँग्रेसला पराभवाचा जोरदार झटका!



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: