navjot singh sidhu : ‘अमरिंदर सिंग यांना तर पत्नीही साथ देत नाही, दुसरे कोण उभे राहणार?’


अमृतसरः राजकारण करता करता पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांची जीभ घसरली आहे. सिद्धू यानी माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांची प्रकारे खिल्ली उडवली. पण टीका करताना सिद्धूंचा तोल गेला. अमृतसर राम तलाई मंदिराच्या कामाचे उद्घाटन करण्यासाठी सिद्धू आले होते. अमरिंदर यांची पत्नी देखील त्यांच्यासोबत उभी राहत नाही. मग इतर कोण त्यांच्या पाठीशी उभं राहणार?, अशी वैयक्तीक टीका सिद्धूंनी केली.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. पण त्यांची पत्नी प्रनीत कौर यांना कोणी विचारा, त्या काँग्रेसचा राजीनामा देणार आहेत की नाही? वाळू माफियांना अमरिंदर सिंग घाबरले. ते भित्रे आहेत, अशी टीकाही सिद्धूंनी केली.

पंजाबच्या गप्पा बाजूने गप्पा मारणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहायचे की पंजाबसाठी उभे असलेल्यांना साध द्यायची आहे, हे अमृतसरच्या जनतेला ठरवावे लागेल. सिद्धूला पंजाबमधून हाकलण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण त्यांनी नेहमीच पंजाबची निवड केली. पंजाबची तिजोरी भरण्यासाठी आपण पहिल्या दिवसापासून लढाईला सुरवात केली होती, असं दावा सिद्धूंनी केला.

rahul gandhi srk : आर्यन खान तुरुंगात असताना शाहरुख खानला राहुल गांधींचे पत्र; लिहिले…

अमरिंदर सिंग भ्याड आहेतः सिद्धू

वाळूचे दर ठरवा, काळाबाजार बंद होईल, हे आपण आधीपासून सांगत आलो. पण मुख्यमंत्री असताना कॅप्टन यांनी हे मान्य केले नाही. बाहेरून येणाऱ्या ट्रककडून ५ हजार रुपये घेतले जातात. मात्र, तो पैसा तिजोरीत जात नाही, वाळू माफियांना मिळतो. अशा प्रकारे तिजोरी भरता येत नाही. अमरिंदर सिंद वाळू माफियांबद्दल बोलत आहेत. त्यांना माहिती होतं, तर ते गप्प का होते. हा भित्रेपणा आहे. ते भ्याड आहेत, असं सिद्धू म्हणाले.

pm modi diwali with jawans : PM मोदी यंदा राजौरीमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणारSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: