दिवाळीच्या पूर्वसंध्येला ‘अशी’ आहे राज्यातील करोनाची स्थिती! १,१९३ नव्या रुग्णांचे निदान


हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात १ हजार १९३ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण १ हजार ५१९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • आज राज्यात एकूण ३९ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई: राज्यात आज करोनाच्या (Coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत किंचित वाढ झाली असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. तसेच मृत्यूसंख्याही घटल्याने राज्याला काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात १ हजार १९३ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या १ हजार ०७८ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण १ हजार ५१९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या १ हजार ०९५ इतकी होती. तर, आजही ३९ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ४८ इतकीहोती. (maharashtra registered 1193 new cases in a day with 1519 patients recovered and 39 deaths today)

आज राज्यात झालेल्या ३९ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवरच स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६४ लाख ५५ हजार १०० रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.६ टक्के इतके आहे.

क्लिक करा आणि वाचा- महापालिका प्रशासकांची माणुसकीची दिवाळी; करोनाने बळी घेतलेल्या कर्मचाऱ्यांच्या घरी भेट

मुंबईत राज्यातील सर्वाधिक सक्रिय रुग्ण

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या १५ हजार ११९ इतकी आहे. काल ही संख्या १५ हजार ४८५ इतकी होती. या बरोबरच राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता मुंबई जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबईत हा आकडा ४ हजार १८६ इतकी आहे. तर पुणे जिल्ह्यात हा आकडा ३ हजार १९४ इतकी आहे. ठाणे जिल्ह्यात ही संख्या १ हजार ६९०, तर अहमदनगरमध्ये ही संख्या २ हजार ०८७ इतकी आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘आम्हीही नको ती अंडी उबवली’, या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर नीलेश राणेंचा प्रहार

त्या खालोखाल रायगडमध्ये ही संख्या ६७२ अशी आहे. तसेच, नाशिकमध्ये ५८३, औरंगाबादमध्ये ४२६, सांगलीत ४१६. तर, सोलापुरात ही संख्या ३३३ इतकी आहे. तर, साताऱ्यात ही संख्या ३२७, पालघरमध्ये २७९, तर रत्नागिरीत ही संख्या १३८ इतकी आहे.

धुळे जिल्ह्यात एक सक्रिय रुग्ण

या बरोबरच, राज्यात सर्वात कमी रुग्णसंख्या नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात आहे. या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी १ सक्रिय रुग्ण आहे.

क्लिक करा आणि वाचा- मुंबईत शासकीय, पालिका केंद्रांवर ४ दिवस लसीकरण बंद; महापालिकेची माहिती

१,८७,२८६ व्यक्ती होम क्वारंटाइन

आतापर्यंत तपासण्यात आलेल्या ६ कोटी २९ लाख ४७ हजार ३५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६ लाख १४ हजार १५८ (१०.५१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ८७ हजार २८६ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर, ८९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: