लशीबाबतच्या वक्तव्यावरून इंदुरीकर महाराजांवर कारवाई? राजेश टोपे म्हणाले…


हायलाइट्स:

  • करोना लशीबाबत वादग्रस्त वक्तव्य
  • इंदुरीकर महाराजांवर सरकार कारवाई करणार?
  • राजेश टोपे यांनी दिली प्रतिक्रिया

बारामती : ‘मी लस घेतली नाही आणि घेणार नाही. तुमचं मन खंबीर असेल तर करोना होणार नाही,’ असं विधान करत इंदुरीकर महाराजांनी खळबळ उडवून दिली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत प्रतिक्रिया देत आपण इंदुरीकर महाराजांना (Indurikar Maharaj Kirtan) लशीचे महत्व पटवून देणार असल्याचं म्हटलं आहे.

‘मी स्वतः इंदुरीकर महाराज यांना भेटून वैज्ञानिक दृष्टीकोनातून लशीचे महत्त्व पटवून देईन आणि ते त्यांच्या किर्तनातून करोना प्रतिबंधक लशीबाबत प्रबोधन करतील,’ असा विश्वास राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे. मात्र या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी राज्य सरकार इंदुरीकर यांच्यावर कारवाई करणार का, या प्रश्नाला मंत्री टोपे यांनी बगल दिली आहे. बारामतीत बुधवारी (दि.३) ते पत्रकारांशी बोलत होते. इंदुरीकर यांनी लसीकरणाविरोधात नुकतंच वक्तव्य केलं. मी स्वतः लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही, असं ते नाशिकमध्ये एका किर्तनात म्हणाले होते. त्यावर आरोग्यमंत्री टोपे यांच्याकडे पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी हे उत्तर दिलं.

Shirdi Deepotsav: साईभक्तांसाठी महत्त्वाची बातमी; शिर्डीत यंदा दीपोत्सव होणार, पण…

‘माझे आणि इंदुरीकर महाराजांचे प्रेमाचे संबंध’

‘प्रबोधनकार-किर्तनकार इंदुरीकर महाराज हे माझ्या अत्यंत परिचयाचे आहेत. ते ज्या पद्धतीने समाजाचे प्रबोधन करतात, समाजाला किर्तनाच्या माध्यमातून संदेश देतात, तो त्यांच्या स्टाईलमुळे लोकांना भावतो. त्यामुळे नागरिक त्यांच्या किर्तनाला मोठी गर्दी करतात. त्यांनी लसीसंबंधी असं वक्तव्य केलं असेल तर मी त्यांच्याशी नक्की बोलेन. करोना संकटामुळे गेली दोन वर्ष किर्तनावर बंधने होती. आता किर्तने सुरू झाली आहेत. महाराजांचे व माझे प्रेमाचे, विश्वासाचे संबंध आहेत. महाराजांनी स्वतःला जरुर प्रोटेक्ट केलेलं असेल किंवा मास्क, सोशल डिस्टन्सिंग अशी काळजी ते घेत असतील. परंतु प्रत्येकाने लस घेणे गरजेचं आहे,’ अशी भूमिका राजेश टोपे यांनी मांडली आहे.

दरम्यान, काही समाजांमध्ये लशीबाबत गैरसमज आहेत. त्यांच्या धर्मगुरुंशी आम्ही बोलून लशीची उपयुक्तता पटवून दिली आहे. इंदुरीकरांनाही मी लक्ष घालून यासंबंधी निश्चित सांगेन, असंही राजेश टोपे म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: