‘एसबीयआय’ची नवी योजना; दुचाकीसाठी घरबसल्या मिळवा ३ लाखांपर्यंतचे कर्ज


हायलाइट्स:

  • एसबीआय ईजी राईड कर्ज (SBI Easy Ride Loan) योजना सुरू केली आहे.
  • ग्राहकांना एसबीआयच्या डिजिटल प्लॅटफॉर्म योनो (YONO) अॅपद्वारे अर्ज करावा लागेल.
  • या योजनेअंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंतच्या दुचाकी कर्जासाठी अर्ज करता येतो.

मुंबई : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने त्यांच्या ग्राहकांसाठी एसबीआय ईजी राईड कर्ज (SBI Easy Ride Loan) योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना एसबीआयच्या डिजिटल प्लॅटफॉर्म योनो (YONO) अॅपद्वारे अर्ज करावा लागेल. या योजनेअंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंतच्या दुचाकी कर्जासाठी अर्ज करता येतो. योनोद्वारे गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांना बँकेने यापूर्वीच ५ बेसिक पॉइंटची सूट जाहीर केली आहे.

SBI ची बंपर कमाई; दुसऱ्या तिमाहीत ७,६२७ कोटींचा विक्रमी नफा
३ लाख रुपयांपर्यंतचे मिळेल कर्ज
बँकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की,एसबीआयचे सर्व पात्र ग्राहक योनो (YONO) अॅपद्वारे कोणत्याही शाखेला भेट न देता डिजिटल पद्धतीने दुचाकी कर्ज घेऊ शकतात. तसेच ग्राहक सुलभ राइड लोन अंतर्गत ३ लाख रुपयांपर्यंत आणि कमीत कमी २०,००० रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी अर्ज करू शकतात. चार वर्षांच्या कमाल कालावधीसाठी कर्जावर १०.५ टक्के वार्षिक व्याज मिळेल.

तेजी परतली; सेन्सेक्स-निफ्टीची आगेकूच, रियल्टी शेअरमध्ये मोठी खरेदी
या योजनेंतर्गत प्री-अप्रूव्ह्ड ग्राहक वाहनाच्या ऑन-रोड किमतीच्या ८५ टक्क्यांपर्यंत कर्ज देखील घेऊ शकतो, ज्याची मुदत केवळ ४५ महिन्यांची असेल आणि ईएमआय (EMI) किमान २५६० रुपये प्रति लाखपर्यंत असेल. हे कर्ज थेट डीलरच्या खात्यावर पाठवले जाईल. एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा म्हणाले, “आम्ही आमच्या ग्राहकांना चांगली सेवा आणि चांगला बँकिंग अनुभव देण्यासाठी सतत प्रयत्न करू.”

PF खात्यात ८.५ टक्के दराने जमा होणार पैसे;मिस्ड कॉल आणि SMS द्वारे अशी तपासा शिल्लक
८ कोटी ९० लाख लोकांकडे अॅप
योनोच्या माध्यमातून एसबीआय (SBI) आपल्या ग्राहकांना अनेक प्रकारच्या सेवा पुरवते. हे अॅप नोव्हेंबर २०१७ मध्ये लाँच करण्यात आले होते. आतापर्यंत हे अॅप ८ कोटी ९० लाख लोकांनी डाऊनलोड केले असून ४ कोटी २० लाख नोंदणीकृत वापरकर्ते आहेत. दररोज एक कोटी १० लाख लोक या अॅपवर लॉग इन करतात.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: