नवी दिल्लीः भारतीय हवाई दलाचे शूर पायलट विंग कमांडर
अभिनंदन वर्तमान (
abhinandan varthaman ) यांचे प्रमोशन करण्यात आले आहे. ग्रुप कॅप्टनपदी पदोन्नती करून त्यांचा गौरव करण्यात आला आहे. बालाकोटवर हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाच्या लढाऊ विमानं भारताच्या दिशेने आली होती. यावेळी अभिनंदन वर्तमान यांनी लढाईत पाकिस्तानी विमानांना पळता भूई थोडी केली होती. अभिनंदन यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक F-16 विमान पाडले होते. अभिनंदन यांच्या पराक्रमाचा गौरव करत सरकारने त्यांचा शौर्य चक्र पुरस्काराने गौरव केला होता.
हवाई दलातील ग्रुप कॅप्टनमध्ये भारतीय लष्करातील कर्नलपदा समान असतो. अभिनंदन वर्तमान यांची हवाई दलाने ग्रुप कॅप्टनपदी पदोन्नती दिली आहे. पाकिस्तानच्या लढाई विमानांना धडा शिकवल्यानंतर अभिनंदन यांचे मिग-२१ हे विमान कोसळले होते. अभिनंदन यांनी विमानातून उडी मारली आणि आणि पॅराशूटने जमिनीवर उतरले. पण त्यांचे पॅराशूट हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्याने अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतले होते.
pm modi pitches for door to door vaccination : संथ लसीकरणावरून PM मोदींचा इशारा, दिला घरोघरी लसीकरणाचा मंत्र
अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारताने पाकिस्तान मोठा दबाव आणला होता. त्यानंतर पाकिस्तान अभिनंदन यांची सुटका करावी लागली होती. अभिनंदन हे श्रीनगरमध्ये हवाई दलाच्या ५१ व्या स्क्वॉड्रनमध्ये आहेत. अभिनंदन यांनी पाकिस्तानचा हवाई हल्ल्याचा कट उधळून लावला होता. २७ फेब्रुवारी २०१९ ला ही घटना घडली होती. भारताने खैबर पखतुनख्वा भागात पाकिस्तान समर्थित जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले होते.
Uttarakhand: केदारनाथ पुरोहितांकडून मोदी दौऱ्याचा विरोध, मुख्यमंत्री धामींकडून मनधरणी
Source link
Like this:
Like Loading...