धनत्रयोदशीनंतर स्वस्त झालं सोनं ! जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा सोने-चांदीचा दर


हायलाइट्स:

  • मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७३२० रुपये आहे.
  • सोने दरात सध्या ३२० रुपयांची घसरण झाली आहे.
  • मंगळवारी सोने १०० रुपयांनी स्वस्त झाले होते.

मुंबई : सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याने यंदा धनत्रयोदशीला सोने विक्रीत चांगली वाढ झाली आहे. सोन्याची विक्री १५ ते २० टक्क्यांनी वाढली असल्याने सराफा व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान आज बुधवारी देखील सोने जवळपास ३२० रुपयांनी स्वस्त झाले आहे.
PF खात्यात ८.५ टक्के दराने जमा होणार पैसे;मिस्ड कॉल आणि SMS द्वारे अशी तपासा शिल्लक
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७३२० रुपये इतका खाली आला आहे. त्यात ३२० रुपयांची घसरण झाली आहे. मंगळवारी सोने १०० रुपयांनी स्वस्त झाले होते. आज एक किलो चांदीचा भाव ६३१९७ रुपये असून त्यात २६ रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे. तत्पूर्वी चांदीने ६२९३० रुपयांचा स्तर गाठला होता.

‘एसबीआय’ला बंपर नफा ; दुसऱ्या तिमाहीत नफ्यात ६६ टक्के वाढ, विक्रमी कमाई
Goodreturns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६७५० रुपये आणि २४ कॅरेटचा भाव ४७७५० रुपयांपर्यंत खाली आला आहे. त्यात १०० रुपयांची घसरण झाली.आज दिल्लीत सोनं २५० रुपयांनी स्वस्त झाले. २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६७०० रुपयांपर्यंत खाली घसरला. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०९०० रुपयांपर्यंत खाली आला. मंगळवारच्या तुलनेत त्यात २५० रुपयांनी घसरण झाली.

छोटे क्रिप्टो करन्सी तेजीत ; जाणून घ्या कोणत्या आभासी चलनात झाली मोठी वाढ
आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४८२० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८९०० रुपये खाली आला आहे. त्यात २८० रुपयांची घसरण झाली. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७२०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९९०० रुपये इतका आहे. त्यात मंगळवारच्या तुलनेत २०० रुपयांची घसरण झाली.

पेपरलेस डिजिटल कर्ज ; डीएमआय फायनान्सची रिलायन्स रिटेलसोबत भागीदारी
दरम्यान, मंगळवारी धनत्रयोदशीला सोन्याच्या विक्रीत १५ ते २० टक्के वाढ झाल्याचा दावा ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष आशिष पेठे यांनी केला. सोन्याची विक्री २०१९ च्या पातळीवर गेली असल्याचे त्यांनी सांगितले. तर इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने यंदा धनत्रयोदशीला २०००० कोटींची सोने विक्री झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: