नवी दिल्लीः भारताच्या करोनावरील कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मंजुरी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. केंद्र सरकारची संस्था आयसीएमआर आणि भारत बायोटेक यांनी संयुक्त विद्यमाने कोवॅक्सिन ही लस विकसित केली आहे. कोवॅक्सिनच्या मंजुरीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लसीचे उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीचे प्रयत्न सुरू होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल अॅडवायजरी ग्रुपने कोवॅक्सिन लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. एका वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.
कोवॅक्सिन ही भारताची स्वदेशी लस आहे. भारत सरकार आणि भारत बायोटेकने मिळून ती विकसित केली आहे. भारताच्या लसीकरण मोहीमेत कोवॅक्सिनसह कोविशिल्ड या लसींचा सर्वाधिक उपयोग होतोय. तसंच या दोन्ही लसींना सर्वप्रथम केंद्र सरकारने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर कोवॅक्सिनला मंजुरी मिळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने शिक्कमोर्तब करण्याची आवश्यकता होती. आता जागतिक आरोग्य संघटनेनेही कोवॅक्सिन लसीला मंजुरी दिल्याने हे भारताचं मोठं यश मानलं जात आहे.
pm modi pitches for door to door vaccination : संथ लसीकरणावरून PM मोदींचा इशारा, दिला घरोघरी लसीकरणाचा मंत्र
कोवॅक्सिन लसीला जागतिक आरोग्य संघटनेकडून मंजुरी न मिळाल्याने विदेश दौऱ्या जाणाऱ्या भारतीयांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. जागतिक आरोग्य संघटनेने कोवॅक्सिनला मंजुरी न दिल्यामुळे कोवॅक्सिन लस घेतलेल्या भारतीयांना अनेक देशांमध्ये क्वारंटाईन केलं जात होतं किंवा प्रवेशास परवानगी नाकारण्यात येत होती. पण आता कोवॅक्सिन लस घेतलेल्या भारतीय नागरिकांच्या विदेश दौऱ्यातील मोठी अडचण दूर झाली आहे.
supreme court : ‘नागरिकांच्या जीवाशी खेळणार नाही… कोवॅक्सिन घेतलेल्यांना कोविशिल्ड देण्याचे निर्देश क
sonia gandhi : ‘PM मोदींच्या वाढदिवसाला १ कोटींवर डोस, रोज का देत नाही?’ सोनिया गांधी बरसल्या
Source link
Like this:
Like Loading...