लोकप्रिय रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी निधन


पुणे : लोकप्रिय रहस्यकथाकार गुरुनाथ नाईक यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी दीर्घ आजाराने पुण्यात निधन झालं आहे. तब्बल बाराशे कादंबऱ्या लिहिणाऱ्या नाईक यांनी मराठी वाचकांवर आपल्या लेखनाने गारूड केलं होतं.

गुरुनाथ नाईक यांच्या कादंबऱ्यांच्या अनेक प्रती निघाल्या, ग्रंथालयांमधून त्यांच्या कादंबऱ्यांना मागणी होती. मात्र १६ वर्षांपूर्वी मेंदूचा पक्षाघात झाल्यानंतर त्यांना काहीही लिहिता आलं नाही. त्यांच्यावर मागील वर्षी मुंबईतील केईएम रुग्णालयातही उपचार करण्यात आले. मात्र त्यांच्या प्रकृतीत फारशी सुधारणा झाली नाही.

Param Bir Singh Affidavit मोठी बातमी: अनिल देशमुखांविरुद्ध परमबीर यांच्याकडे पुरावेच नाहीत; ‘ही’ माहिती आली समोर

गुरुनाथ नाईक हे मराठीतल्या आघाडीच्या रहस्य आणि थरार कथा/कादंबरीकारांपैकी एक होते. बाबुराव अर्नाळकरांप्रमाणेच त्यांनीही हजारांवर रहस्य कादंबर्‍या लिहिल्या आणि एका मोठ्या वाचकवर्गाला खिळवून ठेवले. रहस्यकथा लिहिण्यापूर्वी म्हणजे १९५७ ते १९६३ या काळात गुरुनाथ नाईक यांचे विविध विषयांवर लिखाण सुरू होते. या काळात त्यांनी अनेक मराठी मासिकांतून हेमचंद्र साखळकर आणि नाईक या नावांनी लिखाण केले. आकाशवाणीच्या पुणे केंद्रासाठी काही संगीतिका, तर गोवा केंद्रासाठी काही श्रुतिकाही त्यांनी लिहिल्या.

मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात नोकरीनिमित्त राहिलेले नाईक मूळचे गोव्याचे. गोमंतकातील सत्तरीजवळचे आडवाई साखळी हे त्यांचे मूळ गाव आणि राणे हे त्यांचे मूळ आडनाव होते. प्रिन्सेस कादंबरी लिहून जागतिक कीर्ती मिळविणारे मनोहर माळगावकर हे नाईक यांच्या वडिलांचे -विष्णू नाईक- यांचे जवळचे मित्र होते. माळगावकर यांच्याशी बालपणी झालेल्या चर्चेतूनच गुरुनाथ नाईक यांच्या मनात लिखाणाचे बीज रुजले होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: