रेड रिबन क्लब अंतर्गत युवक युवतींसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२१ संपन्न

रेड रिबन क्लब अंतर्गत युवक युवतींसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा २०२१ संपन्न

पंढरपूर ,दि .३/११/२०२१- पंढरपूर येथे जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग, श्री.छ.शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर, उपजिल्हा रुग्णालय,पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवक युवतींसाठी रेड रिबन क्लब प्रश्नमुंजुषा स्पर्धेचे आयोजन स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग गोपाळपुर येथे केले होते . या स्पर्धेचे उद्घाटन प्रा.डॉ.सोमनाथ ठिगळे सर ,प्रा.डॉ.संदीप वांगीकर सर , भगवान भुसारी , जिल्हा कार्यक्रम अधिकारी , जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण , सोलापूर , डॉ.सयाजीराव गायकवाड , वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी , एआरटी सेंटर ,पंढरपूर , श्री कृष्णा सकट , जिल्हा पर्यवेक्षक ,सोलापूर ,प्रा .डॉ .महेश मठपती सर ,सुभाष जाधव ,प्रा.कुबेर ढोपे , प्रा .माने ,प्रा.गायकवाड सर आदींच्या उपस्थितीत झाले .

    या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्हयातून स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग गोपाळपुर , कर्मवारी भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर , उमा महाविद्यालय पंढरपूर ,देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय मोहोळ व बाबुराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनगर, श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा आदि महाविद्यालयीन युवक युवतींना सहभाग नोंदवला. यामध्ये एचआय व्ही / एड्स , क्षयरोग, गुप्तरोग ,रक्तदान इत्यादी  आरोग्य विषयक प्रश्नांवर रेड रिबन क्लब अंतर्गत प्रश्नमुंजुषा स्पर्धा घेण्यात आली आहे . 

या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक विजेता श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा ,व्दितीय पारितोषिक विजेता स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींग गोपाळपुर आणि तृतीय पारितोषिक विजेता उमा महाविद्यालय पंढरपूर यांना अनुक्रमे बक्षीसे प्राप्त झाली . रेड रिबन क्लब प्रश्नमुंजुषा स्पर्धा ही डॉ.प्रदिप ढेले जिल्हा शल्यचिकित्सक श्री.छ .शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय , सोलापूर , डॉ.अरविंद गिराम वैद्यकिय अधिक्षक  उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली . 

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुरुषोत्तम कदम यांनी केले. आभार प्रदर्शन बाजीराव नामदे यांनी केले .हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती सुनाबी शेख , योगिराज विजापूरे , नागेश देवकर , दिपक गोरे , एजाज बागवान , आबासो नागणे , गेणराज दरेकर विशेष परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: