‘ओला’ कंपनीला अच्छे दिन;तब्बल १० वर्षानंतर केली ही किमया,’आयपीओ’ला मिळणार बळ


हायलाइट्स:

  • राइडिंग अॅप ओला (OLA) ची मूळ कंपनी असलेल्या एएनआय टेक्नॉलॉजीज ला नफा झाला.
  • कंपनी सुरू केल्यानंतर दहा वर्षांनी नफा झाला आहे.
  • आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ८९.९२ रुपये नफा (ऑपरेटिंग प्रॉफिट) कमावला आहे.

नवी दिल्ली : राइडिंग अॅप ओला (OLA) ची मूळ कंपनी असलेल्या एएनआय टेक्नॉलॉजीज (ANI Technologies)ने आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ८९.९२ रुपये नफा (ऑपरेटिंग प्रॉफिट) कमावला आहे. असे असले तरी कंपनीचा महसूल ६५ टक्क्यांनी घसरून ६८९.६१ कोटींवर आला आहे. कोविड-१९ मुळे कंपनीच्या महसुलात घट झाली आहे.

PF खात्यात ८.५ टक्के दराने जमा होणार पैसे;मिस्ड कॉल आणि SMS द्वारे अशी तपासा शिल्लक
कंपनी सुरू केल्यानंतर दहा वर्षांनी नफ्यात येणे ही गोष्ट ओलासाठी खूप महत्त्वाची आहे. कंपनी लवकरच आपला आयपीओ आणणार आहे. आयपीओसाठी कंपनी डिसेंबरमध्ये सेबीकडे ड्राफ्ट पेपर सादर करू शकते. या संदर्भातही दहा वर्षांत पहिल्यांदाच कंपनीने नफा कमावण्याचे महत्त्व वाढले आहे.

‘एसबीआय’ला बंपर नफा ; दुसऱ्या तिमाहीत नफ्यात ६६ टक्के वाढ, विक्रमी कमाई
दहा वर्षांनी कमावला नफा
ओलाची मूळ कंपनी अन्न वितरण आणि आर्थिक सेवा देखील पुरवते. २०२०-२१ या आर्थिक वर्षात कंपनीचा ऑपरेटिंग तोटा ४२९.२० रुपयांवर आला आहे, पण महसुलात ६३ टक्के घट झाली आहे आणि ही घट ९८३.१५ रुपयांवर आली आहे.भाविश अग्रवाल यांनी २०१० मध्ये ओलाची स्थापना केली, आणि गेल्या अनेक वर्षांपासून यामध्ये मोठी गुंतवणूक होत आहे.

‘एसबीयआय’ची नवी योजना; दुचाकीसाठी घरबसल्या मिळवा ३ लाखांपर्यंतचे कर्ज
IPO साठी सेबीकडे ड्राफ्ट पेपर सादर करणार
सुप्रसिद्ध गुंतवणूक कंपनी सॉफ्टबँक समर्थित ओला पुढील काही महिन्यांत आपला आयपीओ लॉन्च करू शकते. किमान ७५०० कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनी डिसेंबरपर्यंत सेबीकडे ड्राफ्ट पेपर सादर करू शकते. ओलाने ग्रॉस मर्चेंडाईज व्हॅल्यू (GMV) ३१ ऑगस्ट रोजी प्री-कोरोना पातळी ओलांडली होती. पहिल्या लाटेच्या तुलनेत कोविडच्या दुसऱ्या लाटेत रिकव्हरी तीनपट झाली आहे. भारतात लोकांचे दळणवळण खूप वाढू लागले आहे. याचा फायदा कंपनीला मिळत आहे, असे अग्रवाल म्हणाले.
छोटे क्रिप्टो करन्सी तेजीत ; जाणून घ्या कोणत्या आभासी चलनात झाली मोठी वाढ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: