आर्यन खान प्रकरण: ५० लाखांची डील करून देणारा सॅम डिसूझा घाबरला; हायकोर्टात धाव


मुंबई: आर्यन खानच्या (Aryan Khan) सुटकेसाठी अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याची मॅनेजर पूजा ददलानी व या प्रकरणातील पंच किरण गोसावी (Kiran Gosavi) यांच्यात ५० लाखांची डील करून देणारा सॅम डिसूझा यानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अटकेपासून संरक्षण द्यावे व अटकपूर्व जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यानं याचिकेद्वारे केली आहे.

कॉर्डेलिया क्रूझवरील ड्रग पार्टीवर २ ऑक्टोबर रोजी झालेल्या कारवाईत आर्यन खानसह अन्य काही जणांना अटक करण्यात आली होती. हे प्रकरण बनावट असून खंडणीसाठी कारवाई केली गेल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला होता. त्यांनी काही फोटोही प्रसिद्ध केले होते. त्यानंतर हळूहळू काही लोक पुढं आले. आर्यन खानला पकडून एनसीबीच्या कार्यालयात नेणारा व त्याला फोनवर बोलण्यास लावणारा किरण गोसावी फरार झाला. तर, दुसरा पंच प्रभाकर साइल पुढं आला आणि त्यानं प्रतिज्ञापत्राद्वारे खंडणीचे आरोप केले. समीर वानखेडे यांनाही खंडणी मिळाल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्यानंतर सॅम डिसूझा हा समोर आला असून त्यानंही काही आरोप केले आहेत. त्यानं समीर वानखेडे यांना क्लीन चिट दिली असली तरी शाहरुख खानकडून खंडणी मागण्यात आल्याचं कबूल केलं आहे. आर्यन खानकडं कुठलंही ड्रग्ज सापडलं नव्हत, असंही त्यानं म्हटलं आहे. किरण गोसावी यानं शाहरुख खानकडून घेतलेले ५० लाख मी परत केल्याचं त्यानं म्हटलं आहे.

वाचा: दिवाळीनंतर नवाब मलिक मोठा धमाका करण्याच्या तयारीत; ‘हे’ ट्वीट सगळं सांगून जातं!

‘माझी यात काहीच चूक नाही. शाहरुख खानचे पैसेही मी त्याच्या मॅनेजरकडं परत केले आहेत. त्यामुळं मला अटकेपासून संरक्षण द्यावं, अशी मागणी डिसूझा यानं न्यायालयाकडं केली आहे. कोणतीही कठोर कारवाई करण्याआधी तीन दिवसांची नोटीस दिली जावी, अशी विनंतीही त्यानं कोर्टाकडं केली आहे.

आर्यन खान प्रकरणात आरोपी असलेला किरण गोसावी सध्या पुण्यातील एका फसवणुकीच्या प्रकरणात कोठडीत आहे. तर, समीर वानखेडे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्याआधी त्यांना तीन दिवसांची आगाऊ नोटीस दिली जाईल, असं मुंबई पोलिसांनी न्यायालयात सांगितलं आहे. त्यामुळं घाबरलेल्या डिसूझानं न्यायालयात धाव घेतली आहे.

वाचा: ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळंच वळण; समीर वानखेडे यांच्यावर पुष्पवृष्टीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: