आत्तापर्यंत आपण सर्वांनी नागरिकांना लसीकरण केंद्रात नेण्याची आणि तिथे सुरक्षित लसीकरण करण्याची व्यवस्था केली आहे. आता प्रत्येक घरात लस, घरोघरी लस, या भावनेने तुम्हाला प्रत्येक घरापर्यंत पोहोचायचे आहे. तुम्हाला प्रत्येक गावासाठी, तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक शहरासाठी वेगवेगळी रणनीती बनवायची असेल, तर तीही बनवा. तुम्ही विभागानुसार २०-२५ जणांची टीम तयार करून देखील हे करू शकता, असं पीएम मोदींनी सांगितलं.
‘सर्वांना लस, मोफत लस’ या मोहिमेअंतर्गत आपण एका दिवसात सुमारे २.५ कोटी लसीचे डोस देवून दाखले आहे. यातून आपली क्षमता आणि आपले सामर्थ्य काय आहे हे दिसून येते. प्रत्येक घरात दार ठोठावताना तुम्हा सर्वांना पहिल्या डोसबरोबरच दुसऱ्या डोसकडेही समान लक्ष द्यावे लागेल. कारण संसर्गाची रुग्ण कमी होऊ लागतात तेव्हा काहीवेळा निकडीची भावना कमी होते. काय घाई आहे, डोस घेऊ नंतर, असा विचार नागरिक करू लागता, असं पीएम म्हणाले.
संथ लसीकरणावर PM मोदींनी दिला इशारा
लसीकरण मोहीमेत आरोग्य कर्मचारी आणि आशा कार्यर्कत्यांनी मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी दुर्गम भागांमध्ये जाऊन नागरिकांचे लसीकरण केले आहे, असं कौतुक पंतप्रधान मोदींनी केलं. लसीकरण मोहीमेत आपण आतापर्यंत जी काही प्रगती केली आहे, त्याचं यश प्रशासन आणि आशा वर्कर्सना आहे. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. एक डोस देण्यासाठी त्यांनी कित्येक मैल प्रवास केला आहे. अतिशय दुर्गम भागात पोहोचले आहेत. पण करोनावरील लसीकरण मोहीमेत आपण १०० कोटी डोसचा टप्पा ओलांडल्यानंतर संथ झालो तर नवीन आव्हान समोर उभे ठाकतील, असा इशारा पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला.
शत्रू आणि रोगाकडे दुर्लक्ष करू नये, असं म्हणतात. यामुळे याविरोधात शेवटपर्यंत लढाई लढावी लागेल. यामुळे या लढाईत कुठलाही संथपणा किंवा हलगर्जीपणा ठेवून चालणार नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच व्हॅटिकनमध्ये पोप फ्रान्सिस यांना मी भेटलो होतो. धर्मगुरूंचा लसीबाबतचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावरही आपल्याला विशेष भर द्यावा लागेल. नागरिकांमध्ये अफवा आणि भ्रम हे एक मोठे आव्हान आहे. यावर एक मोठा उपाय म्हणजे नागरिकांना अधिकाधिक जागरूक करणे. यामध्ये तुम्ही स्थानिक धार्मिक नेत्यांचीही अधिक मदत घेऊ शकता, असं आवाहन पीए मोदींनी केलं.
केदारनाथ पुरोहितांकडून मोदी दौऱ्याचा विरोध, मुख्यमंत्री धामींकडून मनधरणी
करोनावरील लसीकरण ५० टक्क्यांहून कमी आहे आणि करोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे आणि फार कमी नागरिकांना दुसरा डोस मिळाला आहे, अशा जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीत उपस्थित होते. या जिल्ह्यांमध्ये लसीकरण कमी होण्याच्या कारणांचा आढावा पंतप्रधान मोदींनी घेतला आणि त्यावरील उपाययोजना करण्याबाबत चर्चा केली.
Corona Vaccination: आज पंतप्रधानांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक, मुख्यमंत्रीही राहणार उपस्थित
दिल्लीतील उत्तर पश्चिम जिल्हा, हरयाणातील नूह, बिहारमधील अररिया आणि छत्तीसगडमधील नारायणपूर या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. यासह झारखंडमधील ९ जिल्ह्यांमध्ये पाकूर, साहेबगंज, गढवा, देवघर, पश्चिम सिंगभूम, गिरिडीह, लातेहार, गोड्डा आणि गुमला यांचा समावेश आहे. याशिवाय अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रत्येकी ६ जिल्हे, मणिपूर आणि नागालँडमध्ये प्रत्येकी ८, मेघालयात ४ आणि तामिळनाडू, मिझोराम आणि आसाममध्ये प्रत्येकी १ जिल्हा लसीकरण मोहीमेत मागे आहे.