असे काय झाले की पाकिस्तानचे खेळाडू नामिबिया संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये गेले; पाहा Video


अबुधाबी: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये मंगळवारी अबुधाबीत झालेल्या सामन्यात पाकिस्तानने नामिबियाचा ४५ धावांनी पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने सेमीफायनलमधील स्थान निश्चित केले. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करत १८९ धावा केल्या होत्या. उत्तरा दाखल नामिबियाला २० षटकात ५ बाद १४४ धावा करता आल्या.

वाचा- हार्दिक, भुवीला डच्चू; विराटबाबत BCCI दोन दिवसा घेणार मोठा निर्णय

सामना झाल्यानंतर पाकिस्तान संघातील काही खेळाडू थेट नामिबिया संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये गेले आणि त्यांनी संघाचे अभिनंदन केले. या घटनेचा व्हिडिओ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. पाक संघातील खेळाडू शाहीन शाह आफरीदी, मोहम्मद हफीज, हसन अली, फखर जमा, शादाब खान आणि अन्य खेळाडू नामिबियाच्या ड्रेसिंग रुममध्ये गेले. त्यांनी नामिबियाच्या खेळाडू आणि अधिकाऱ्यांचे चांगल्या कामगिरीबद्दल कौतुक केले.

वाचा- भारतीय संघाची आजपासून सन्मानाची लढाई; अफगाणिस्तानविरुद्ध हवा मोठा

पाकिस्तानविरुद्ध नामिबियाचा पराभव झाला असला तरी त्यांनी चांगली लढत दिली. विजयासाठी १९० धावांचे लक्ष्य मोठे होते. तरी त्यांनी पाकिस्तानच्या मजबूत गोलंदाजीसमोर १४४ धावा केल्या. पाकिस्तानचा हा स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला. त्यांनी टी-२० वर्ल्डकप २०२१ मध्ये आतापर्यंत एकही मॅच गमावलेली नाही. प्रथम भारत त्यानंतर न्यूझीलंड, अफगाणिस्तान आणि काल नामिबियाचा पराभव करून पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. नामिबियाने ग्रुप फेरीत स्कॉटलंडचा पराभव केला होता. आता त्यांच्या लढती भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध होणार आहेत.

अबुधाबीत झालेल्या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी पहिल्या विकेटसाठी ११३ धावांची भागिदारी केली. बाबरने ७० तर रिझवानने ७९ धावा केल्या. या जोडीने स्पर्धेत दुसऱ्यांदा शतकी भागिदारी केली आहे. नामिबियाकडून डेव्हिड वीसेने नाबाद ४३ धावा केल्या. तर पाककडून हसन अलीने २२ धावा देत ४ विकेट घेतल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: