आज सकाळच्या सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. सध्या मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १२८ अंकांनी वधारला असून तो ६०१५७ अंकावर आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ४५ अंकांनी वाढून तो १७९३४ अंकावर ट्रेड करत आहे. तत्पूर्वी बाजार सुरु होताच सेन्सेक्सने २५० अंकांची झेप घेतली होती. तो ६०२८२ अंकावर गेला होता.
छोटे क्रिप्टो करन्सी तेजीत ; जाणून घ्या कोणत्या आभासी चलनात झाली मोठी वाढ
सेन्सेक्समधील ३० पैकी तब्बल २९ शेअर तेजीत आहेत. मुहूर्ताच्या सौद्यांपूर्वी गुंतवणूकदार ब्लूचिप शेअरची खरेदी करत असल्याचे दिसून आले आहे. भारती एअरटेल, टेक महिंद्रा, एनटीपीसी, बजाज फायनान्स, एल अँड टी , कोटक महिंद्रा बँक, एचसीएफसी, मारुती, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक, टीसीएस, टायटन, बजाज ऑटो, एसबीआय या शेअरमध्ये वाढ झाली आहे.
मुहूर्ताला सोनं झालं स्वस्त! जाणून घ्या आजचा सोने चांदीचा भाव
एनएसईवर व्होडाफोन, भारती एअरटेल, बँक ऑफ बडोदा, येस बँक, भेल , सेल, पीएनबी या शेअरमध्ये वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये पीएमआय इंडेक्स ५८.४ झाला आहे. सप्टेंबरच्या तुलनेत त्यात वाढ झाली. सप्टेंबरमध्ये पीएमआय ५५.२ होता. तर एप्रिलपासून तो सर्वाधिक आहे. अर्थव्यवस्था सुधारत असल्याचे दिसून आले आहे.
यावर्षी स्टॉक एक्स्चेंजेसनी पारंपरिक एका तासाच्या विशेष मुहुर्तासाठी ४ नोव्हेंबरला संध्याकाळी ६:१५ ते ७:१५ ही वेळ ठरवली आहे. ब्लॉक डील सत्र सायंकाळी ५:४५ ते ६:०० वाजेपर्यंत चालणार आहे. प्री-ओपन सत्र सायंकाळी ६:०० वाजता सुरू होऊन ६:०८ वाजता संपणार आहे.