देवेंद्र फडणवीस की समीर वानखेडे?; ‘द ललित’मधील रहस्याशी संबंध कोणाचा? नवाब मलिक यांच्या ट्वीटमुळं चर्चा


हायलाइट्स:

  • राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचं नवं ट्वीट
  • हॉटेल ‘द ललित’मध्ये अनेक गुपितं दडल्याचा दावा
  • दिवाळी संपल्यानंतर करणार गौप्यस्फोट

मुंबई: ड्रग्ज प्रकरणावरून सुरू झालेले आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय वाद थांबण्याची शक्यता दिसत नाही. समीर वानखेडे (Sameer Wankhede) व नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यापासून सुरू झालेला हा वाद आता ‘नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस‘ (Devendra Fadnavis) अशा वळणावर आला आहे. फडणवीस यांनी दिवाळीनंतर मलिक यांच्या विरोधात आरोपांचे व पुराव्यांचे बॉम्ब फोडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता नवाब मलिक यांनी आणखी एक ट्वीट करून सस्पेन्स वाढवला आहे.

एनसीबीचे मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे हे खंडणीसाठी निर्दोष लोकांना ड्रग्ज प्रकरणात अडकवतात. समीर खान, आर्यन खान यांच्या बाबतीत हेच झालं आहे, असा आरोप करत नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी जाहीर केलेल्या काही पुराव्यांमुळं एनसीबीला वानखेडे यांची चौकशी करावी लागली आहे. मलिक यांनी ड्रग्ज प्रकरणाशी भाजपचाही संबंध असल्याचा आरोप केला आहे. अलीकडंच त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व त्यांच्या पत्नीचे ड्रग पेडलकर जयदीप राणा याच्याशी संबंध असल्याचाही गौप्यस्फोट केला आहे. त्यास उत्तर देताना फडणवीसांनी मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. दिवाळीनंतर त्याचे पुरावे मीडियासमोर ठेवणार, असा इशारा दिला आहे.

वाचा: ड्रग्ज प्रकरणाला आता वेगळंच वळण; समीर वानखेडे यांच्यावर पुष्पवृष्टी

फडणवीसांचं हे आव्हान स्वीकारणाऱ्या नवाब मलिक यांनीही आता दिवाळीनंतर धमाका करण्याची तयारी केली आहे. आज एका मागोमाग एक ट्वीट करून त्यांनी याची चुणूक दाखवली आहे. ‘बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी, लोग बेवजह उदासी का सबब पूछेंगे…’ असं मलिक यांनी पहिल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्यानंतर, काही वेळानंतर त्यांनी दुसरं ट्वीट केलं आहे. त्याद्वारे त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘सर्वांची दिवाळी मंगलमय व्हावी, असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मुंबईतील ‘द ललित’ हॉटेलचाही उल्लेख केला आहे. या हॉटेलमध्ये अनेक गुपितं लपली आहेत. रविवारी भेटू,’ असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ‘हॉटेल ललित’मध्ये नेमकं काय घडलंय? त्याचा संबंध समीर वानखेडे यांच्याशी आहे की देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

वाचा: अशोक चव्हाणांचे राजकीय वजन वाढले; देगलूर विजयानंतर थेट दिल्लीतून फोनSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: