गोफणगुंडा……
आरोपी जामिनावर सुटतो
त्याच जंगी स्वागत होते
प्रसार माध्यमातून प्रसिद्धीची
जबरदस्त वावटळ
चाहत्यांची गर्दी फटाक्यांची धमाल
हा लोकशाहीचा शाप आहे का वरदान
प्रश्न आहे आपण कोठे चाललो आहोत
भान राहिलं का हाही प्रश्न अनुत्तरित राहतो आहे
लोकशाही संविधान संस्कार सभ्यता
सारेच मातीमोल ठरतं आहे
याचंही उत्तर मिळेल का प्रश्न आहेच
मंत्र्याचा मुलगा माणसं चिरडून मारतो
सिनेअभिनेत्याचा मुलगा रेव्ह पार्टीत सापडतो
कुप्रसिद्ध गुन्हेगार तुरुंगातून बाहेर येताच
जंगी मिरवणूक काढतो
मंत्र्यांवर पोलीस आयुक्त जाहीर आरोप करतो
हे सारे काय सूचित करते
सत्ता का सत्यमेव जयते ?
दीपावली उत्सव ,सण अर्थात पूजा प्रकाशाची !
तो प्रकाश ज्ञानाचा चारित्र्याचा अपरिग्रहत्वाचा
परोपकाराचा सत्य अहिंसा मानवतेचा !!
सर्व एकत्रित येऊन वृद्धींगत करू यात दीपावली सतगुण देणाऱ्या प्रकाशाची !!
पंचनामा….
वनवास भोगला म्हणून कोणी राम होत नाही
सत्तेची पूजा केल्याने पाप मुक्ती होत नाही
पैसा पेरल्याने सत्य मरत नाही
शक्तिमान आहे म्हणून नीतीमान ठरतं नाही
अफवा रूजवल्याने वास्तव बदलत नाही
खुर्चीवर आहे म्हणून
सूर्याला कोणी आव्हानं देवू शकत नाही !!
आनंद कोठडीया,कृषीरत्न ,जेऊर ९४०४६९२२००
