Corona Vaccination: आज पंतप्रधानांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक, मुख्यमंत्रीही राहणार उपस्थित


हायलाइट्स:

  • करोना लसीकरण समीक्षा बैठक
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली बैठक
  • राज्यांचे मुख्यमंत्रीही राहणार उपस्थित

नवी दिल्ली : ‘जी २० शिखर संमेलन’ आणि ‘सीओपी २६’ मध्ये भाग घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतात परतलेत. आज (बुधवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी दुपारी १२.०० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देभरातील काही निवडक जिल्हाधिकाऱ्यांसोबत करोना लसीकरणासंबंधी समीक्षा बैठक घेणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे, या बैठकीत संबंधित राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील हजेरी लावतील.

देशात सर्वात कमी लसीकरणाची नोंद झालेले हे जिल्हे आहेत. या बैठकीत कोविडच्या लसीकरणाच्या पहिल्या डोसचे ५० टक्क्यांहून कमी आणि दुसऱ्या डोसचा दर कमी असणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश आहे.

PM Narendra Modi: लसीकरण ५० टक्क्यांहून कमी, पंतप्रधान मोदींची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक
खरेदीला जोर! ‘जीएसटी’ गोळा करण्यात महाराष्ट्र टॉपवर, पहिल्या पाचात यूपीचाही नंबर

या बैठकीत महाराष्ट्र, झारखंड, मणिपूर, नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि इतर राज्यांतील ४० हून अधिक जिल्हाधिकारी सहभागी होणार आहेत.

देशात मंगळवारपर्यंत कोविड १९ विरुद्ध १०७ कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळपर्यंत ३७ लाख ३८ हजार ५७४ लसीचे डोस देण्यात आले.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील ७८ टक्के लोकसंख्येला कोविड १९ लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर ३८ टक्के लोकसंख्येला लसीचे दोन्ही डोस मिळालेले आहेत.

COP26 Summit : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगभरातील नेत्यांची अशी घेतली भेट

PHOTO : पंतप्रधान मोदींकडून पोप फ्रान्सिस यांना भारतात येण्याचं निमंत्रणSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *